सामुदायिक शुभविवाह-२३ जाने.२००८

Posted in

सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळाः

२३ जानेवारी २००८ रोजी शिवसेनाप्रमूख मा.श्री.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मालेगांव पोलिस परेड ग्राउंड येथे सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सदर विवाह सोहळ्यात दलित बांधवांचे ११, आदिवासी बांधवांचे ११६, मुस्लिम बांधवांचे ३ व इतर २१ असे १५१ जोडप्यांचे सामुदायिक विवाह संपन्न झाला.

त्याचप्रमाणे दि. ०४-०२-२००९ रोजी दलित बांधवांचे ११, आदिवासी बांधवांचे ११७, मुस्लिम बांधवांचे १२ व इतर १३ असे १५३ जोडप्यांचे सामुदायिक विवाह संपन्न झाला.

शासनाच्या कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी विकास प्रकल्पामार्फत आदिवासी जोडप्यांना प्रत्येकी १०,००० रु.चे भांडे व दागिने देण्यात आले. तसेच समाजकल्याण मार्फत दलित जोडप्यांना प्रत्येकी १०,००० रु.चा धनादेश देण्यात आला. नवरदेव नवरीसाठी संपूर्ण साज, कपडे, वाजंत्रीसह सर्व खर्च शिवसेनेतर्फे करण्यात आला.

सामुदायिक विवाह सोहळ्यातील गोर-गरीब सर्वधर्मिय वधू-वरांना आशिर्वाद देणेसाठी ५०,००० चा जनसमुदाय उपस्थित होता. सर्व व-हाडी मंडळीस शिवसेनेतर्फे स्नेह भोजन देण्यात आले.
असा भव्य कार्यक्रम मालेगांव तालुक्यात झाला नाही अशा सर्व साधारण जनतेच्या प्रतिक्रिया आहेत !

क्षणचित्रेः











This entry was posted at 12:26 AM and is filed under . You can follow any responses to this entry through the .

0 comments

चित्रदर्शनः