दादाभाऊ भुसे.... समाजकारणाचे अधिकराव्रत घेतलेल्या य उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा जन्म मालेगांव येथे स्वातंत्र्यसैनिक श्री. दगडू बयाजी भुसे व रेश्माबाई दगडू भुसे यांच्या पोटी झाला. दादांना समाजकार्याचे, देशसेवेचे बाळकडू अर्थातच त्यांच्या वडीलांकडूनच मिळाले.

माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर धुळे येथून Diploma in Civil Engineering पर्यंतचे शिक्षण घेतले.या नंतर वयाच्या १८ व्या वर्षी पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून रुजू झाले. तब्बल ११ वर्षे आपली नोकरी ईमानेतबारे केली. मात्र लहानपणापासूनच समाजकार्याची, जनसेवेची आस असलेले दादा त्यानंतर मात्र नोकरीत फारसे रमले नाहीत.
समाजाविषयीची तळमळ दादांना स्वस्थ बसू देत नव्ह्ती. याच विचारातून बंडूकाका बच्छाव आणि त्यांचे समविचारी असंख्य सहकारी यांच्या माध्यमातून तसेच शिवसेनाप्रमूख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिकवणीतून आणि स्व. आनंद दिघे साहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून "जाणता राजा" ही संघटना उभारली. या संघटनेच्या माध्यमातून दादांनी पूर्णतः समाजकार्यासाठी वाहून घेतले. यात रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना वह्यापुस्तकांचे वाटप, दुष्काळी परिस्थितीत टँकरद्वारे मोफत पाणी वाटप, सायकल रँली, अद्ययावत हिंदू जिमखान्याची निर्मिती असे लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले. या विधायक कार्यक्रमांसाठी तरूणांची मोठी फौज उभारली.
२००२ साली शिवसेनेने त्यांची तालुकाप्रमुख पदी निवड केली. त्यांचे व त्यांच्या संघटनेचे हे निरपेक्ष सेवाव्रत पाहून मालेगांव तालुक्यातील जनतेने या कार्याची दखल घेत सन २००४ मध्ये दाभाडी विधानसभा मतदारसंघातून त्यांना अपक्ष आमदार म्हणून निवडून दिले. अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दादांनी जनसेवेचे कंकण हाती बांधून आपल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात तन-मन-धनाने, अथक परिश्रमांनी, समर्पित भावनेने विकासकामे हाती घेवून ती पूर्ण केली आणि मालेगांव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नव्हे तर सालदार म्हणून काम करेन हे शब्द तत्त्वतः पाळले; आणि जनतेचा, शिवसेनाप्रमुखांचा विश्वास सार्थ ठरविला.
मालेगांवचा विकास हाच श्वास हे ब्रीद मनांत बाळगून गेली ५ वर्षे अविश्रांत, कठोर मेहनत घेणारे आमदार दादा भुसे जनसेवेच्या या व्रताचे अखंडत्व टिकविण्यासाठी यंदाच्या, सन २००९ च्या विधानसभा निवडणूकीत मालेगांव बाह्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूकीच्या रणांगणात उतरले आहेत. पुन्हा एकदा... समाजसेवेच्या संधीसाठी, पुन्हा एकदा... दीन दलित-गोरगरींबांचे अश्रू पुसण्यासाठी, पुन्हा एकदा... मालेगांवच्या विकासासाठी सुज्ञ मतदार राजाला हाक घालत आहेत....
This entry was posted
at 12:58 AM
and is filed under
अल्प परीचय
. You can follow any responses to this entry through the
.